ABOUT US

श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट, मोताळा, जि.बुलढाणा

श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट, मोताळा. या संस्थेची स्थापना 25 जानेवारी 2012 रोजी करण्यात आली. या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे श्री गजानन महाराज यांचे मंदिर बांधणे, तसेच लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करून त्यांच्याकडून पुण्यकर्म करून घेणे, आध्यात्मिक मार्गदर्शन करून बाल संस्कार शिबिर, गर्भ संस्कार शिबिर, योगासन, प्राणायाम, गायीचे महत्त्व, इत्यादी गोष्टीचे महत्त्व सांगणे. तसेच गोशाळा स्थापन करून गोमूत्र, गवरी लोकांना उपलब्ध करून देणे. तसेच आता सध्या बरेच लोक आयुर्वेदिक कडे वळत आहेत त्यांच्यासाठी आयुर्वेदिक झाडांची बी बियाणे उपलब्ध करून देणे, आयुर्वेदिक औषधी चे महत्व सांगणे व आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देणे.

श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करून त्याचे विश्लेषण करून सांगणे. रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, बजरंग बली स्तोत्र, इत्यादी पाठांतर करणे व करून घेणे. स्वावलंबनासाठी त्यांना मार्गदर्शन करणे. इत्यादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.