Aashriwad Yojana (आशीर्वाद योजना)

Aashriwad Yojana (आशीर्वाद योजना)

सप्रेम नमस्कार / जय गजानन

श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट, मोताळा. यांच्यातर्फे मोताळा येथे श्री गजानन महाराज व राधाकृष्ण यांचे मंदिर बांधण्यात येत आहे. सध्या गर्भगृहाचे काम पूर्ण झालेले आहे. श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट तर्फे आध्यात्मिक व पुण्यकर्म राबविले जातात, जसे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटणे, पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची भांड्यांची वाटप करणे, नर्मदापरिक्रमा वासियांना अन्नदान करणे, वृक्षारोपण, यज्ञ, इत्यादी.

भविष्यामध्ये भक्त निवास, ज्येष्ठ नागरिक सेवा आश्रम, तसेच गोशाळा बांधण्यात येणार आहे. व गोशाळे मार्फत गोमूत्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या अगरबत्त्या, गायीचे गवरी इत्यादी भाविकांना पुरवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी [email protected] किंवा +91 7588428223 वर संपर्क करा *

आपण जी देणगी देणार ती वरील कामासाठी उपयोगात येणार आहे.

आपल्याला आयकर कलम 80G नुसार करमाफीचा फायदा मिळेल. अधिक माहितीसाठी खालील इमेल वर आपण आपले नाव, पॅनकार्ड कॉपी, आधार कार्ड कॉपी व डोनेशन पावती पाठवावी. [email protected]


महत्वाचे – एकदा दिलेली देणगी परत मिळणार नाही.

Note – Donation done will not be refunded in any case